मुंबईत पुन्हा सुरु होणार का छम...छम ? डान्सबार प्रकरणाचा आज निकाल

Update: 2019-01-17 05:14 GMT

आज (गुरुवारी) डान्सबार प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय महत्त्वाचा निकाल देणार असून संपूर्ण महाराष्ट्रच लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. डान्सबार कायदा राहणार की रद्द होणार यावर आज निर्णय येणार आहे.

काय आहे प्रकरण...

डान्सबार प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कडक कायदा केला असून त्यातील नियम आणि अटी जाचक असल्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी डान्सबार मालकांनी केली आहे. तर कायद्यातील नियम डान्सगर्लच्या हिताचे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गरजेचे असल्याची बाजू महाराष्ट्र सरकारने न्यायालयात मांडली . या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात सरकार आणि याचिकाकर्त्यांनी मांडलेले मुद्दे -

- बार मालकांनी बारबालासोबत करार करणे आवश्यक आहे.

- बारबालांना ठराविक पगार दिला गेला पाहीजे. तो पगार थेट बारबालाच्या बॅंक खात्यात टाकला पाहीजे.

- वयाच्या ३०-३५ नंतर बारबालांना काम मिळत नाही. त्यांच्यासाठी करारपद्धती करायला पाहीजे.

- पीएफ ची सोय करायला पाहीजे. गुन्हेगारी पार्श्व भूमी आहे का ते पहावे.

- अग्निशमन उपाय आणि महापालिका एनओसी घ्यावी. हे सर्व मुद्दे कायद्यात समाविष्ट केले आहेत.

- बार धार्मिक स्थळे आणि शाळा यापासून किमान एक किलोमीटर दूर असावे

- डान्स बारमध्ये ग्राहक लाखो रूपये उधळतात. पैसे उधळण्याऐवजी अथवा ग्राहकाने दिलेली टीप बिलामध्ये समाविष्ट करावी.

- त्यामुळे त्यावरील टॅक्स सरकारच्या तिजोरीत जमा होईल. पैसे उधळण्याची कृती करता कामा नये.

- बारबाला मुलीशी गैरवर्तणूक केल्यास किंवा बारमध्ये वाद झाल्यास सीसीटीव्ही पुरावा म्हणून महत्त्वाचा. घटना घडल्याबरोबर आरोपीला पकडता येईल.

मात्र ह्या सगळ्या मुद्द्यांच्याविरोधात बारमालक असून नेमकं सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचे राहिल.

 

 

 

Similar News