गुगल हे असे माध्यम म्हणून ओळखले जाते की जिथे कोणतीही माहिती अगदी सहज मिळवता येते. परंतू सध्या गुगलवरील विचित्र सर्च रिझल्टमुळे पुन्हा भारत चर्चेत आला आहे. सध्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव 'बार गर्ल इन इंडिया’ सर्च केल्यावर प्रथम दिसते आहे. त्यामुळे याबाबत सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे. याआधी देखील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अशा अनेक नामांकित व्यक्तीबाबत असा प्रकार घडला आहे. याबाबत गुगलने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार १९ डिसेंबरला बार गर्ल सर्च ट्रेडिंग यादीत आघाडीवर होता.
उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड,
कोण आहेत सोनिया गांधी?
९ डिसेंबर १९४६ रोजी सोनियांचा इटलीत जन्म झाला.
राजीव गांधींशी लग्न झाल्यानंतरही त्या राजकारणापासून दूर होत्या. पण राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यांना नाइलाजाने राजकारणात सक्रिय व्हावे लागले.
२७ एप्रिल १९८३ मध्ये त्यांनी इटलीच्या नागरिकत्वाचा त्याग केला.
१९९८ मध्ये सोनिया यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गेली १९ वर्षे या पदावर राहणाऱ्या त्या एकमेव नेत्या.
२००४ मध्ये पंतप्रधान होण्याची संधी नम्रपणे नाकारत त्यांनी डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला.
अवघ्या २२ व्या वर्षी १९६८ मध्ये त्यांचं राजीव गांधी यांच्याशी लग्न झालं.
लग्नासाठी त्या पहिल्यांदाच भारतात आल्या होत्या.
राजीव गांधी यांच्या निधनानंतर राजकारणाची आवड नसतानाही या देशाचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी केलं.
परदेशी सोनिया गांधी यांना भारताबद्दल जास्त माहित नसतानाही पतीच्या निधनानंतर देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारी महिला म्हणजे सोनिया गांधी.
निवडणुकांसाठी ही खेळी ?
पाच राज्याच्या निवडणुकांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होती. यात भाजपाचा दारून पराभव करत काँग्रेसने विजय मिळवला. परंतु निवडणुका जिंकण्यासाठी काही पक्षांकडून कुठल्याही थराला जाऊन कँम्पेन केलं जात आहे. राजकारणात सक्रिय असलेल्या महिला काही लोकांना बघवत नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
महिलांना डावलण्याचा प्रयत्न
गुगल सर्चनुसार, बार गर्ल इन इंडिया सोनिया गांधी असं येत आहे. परंतु एका महिलेविरोधात असे कॅम्पेन चालवणे किंवा एखाद्या बौद्धिकतेच्या चर्चेत, निर्णयात महिलांचा समावेश करुन न घेणं सतत दुय्यम दर्जा महिलांना देणं असे एक ना अनेक किस्से सुरु आहे. सध्या मनुस्मृती प्रमाणे महिलांना वागणूक दिली जातेय असं चित्र दिसू लागलेय. कारण समाजात काही विनाशकारी बुद्धिवंत आहे जे सोनिया गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या स्वार्थासाठी एका महिलेला टार्गेट करणे अत्यंत लाजिरवानी गोष्ट आहे. ज्या महिलेने इतके वर्ष एका राष्ट्रीय पक्षाची जबाबदारी लिलया पार पाडली त्या महिलेविरोधात अशा पद्धतीने कट रचण्याचं काम सध्या सुरु असल्याचे स्पष्ट होते.