शहरातील केडगाव येथे उमेदवारांसाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. तेव्हा शिवसनेच्या उपनेत्या निलम गोर्हे यांनी आपल्या भाषणातून सर्वांशी संवाद साधला.
तेव्हा त्या म्हणाल्या, शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठीशी सातत्याने उभी राहते. विकासामध्ये शिवसेनेचे योगदान नेहमीच असते, म्हणून सर्वसामान्य जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहते. नगर शहर भयमुक्त करताना शहराचा विकासही शिवसेनेने केला आहे. आगामी काळात मुंबई, पुण्याच्या धर्तीवर काही प्रकल्प आणून शहराच्या विकासामध्ये निश्चितपणे भर दिला जाईल, महानगरपालिकेत शिवसेनेचीच सत्ता येणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे जिल्हयाचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकर्यांबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी असे जाहीर आवाहन त्यांनी यावेळी केले.
पुढे त्या म्हणाल्या की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्वसामान्याचे प्रश्न सोडवावेत, ही भूमिका घेवून विकासाचा रथ राज्यामध्ये हाकण्यास सुरवात केली आहे. त्याच धर्तीवर राज्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विकासाची कामे सुरु आहेत. नगरला उड्डाणपूल व्हावा, नगरचा पाणीप्रश्न सुटावा, रस्त्यांचा प्रश्न सुटावा, शहरात न्यायालयाची इमारत उभी राहावी यासाठी महापौर व पदाधिकार्यांनी वेळोवेळी पाठपुरवा केला व तर शिवसेना लोकप्रतिनिधींनी विधानसभेत विषय मांडून शहरातील प्रश्न सोडवले आहेत,
या कार्यक्रमावेळी महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शुभांगी नांदगावकर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी यांच्यासह उमेदवार यावेळी उपस्थित होते.