शिवसेनेचं दबावतंत्र! चाणक्य निवडणूक

Update: 2019-02-12 05:29 GMT

आगामी निवडणुका लक्षात घेता प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. मात्र असं जरी असलं तरी ज्या प्रकारे विरोधक महाआघा़डी करून आपली एकी दाखवत आहे. तशी एकी सत्तेत बसलेल्या सेना-भाजपात पाहायला मिळत नाही. सेना-भाजपामध्ये युती होणार की नाही हे तर वेळचं सांगेल मात्र ज्या पद्धतीने शिवसेना आपली पाऊलं उचलत आहे त्यावरुन असं चित्र स्पष्ट होतेय की शिवसेनेने एनडीएत आपला दबावगट बनवायला सुरुवात केली आहे. कारण नुकतेचं आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमशी शिवसेनेची जवळीक अधिक घट्ट झाली आहे. युती होणार असल्याचा बोभाटा करत मिरवणाऱ्या भाजपाला शिवसेने दिल्लीत चंद्राबाबूंच्या उपोषणास पाठिंबा देत जोरदार धक्काच दिलाय. चंद्राबाबूंच्या उपोषणस्थळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाऊन पाठिंबा व्यक्त केल्यानं सेना दबावतंत्राचा वापर करत असल्याची चर्चा सुरु झाली.

सौ. एएनआय

एवढचं नव्हे तर निवडणुक प्रचारक चाणाक्य असलेले प्रशांत किशोर नुकतेचं मातोश्रीवर भेट देऊन गेले.

सौ. सोशल मीडिया

दररोज सामनाच्या अग्रलेखातून मित्रपक्ष भाजपावर शिवसेना तोफ डागत असते. तसेच विरोधक असलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींच्या रॅलीचेही सामना मुखपत्रातून कौतुक होत आहे.

सौ. सामना

वरील सर्व बाबी लक्षात घेता २०१९च्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने एनडीएत दबावगट बनवायला सुरुवात केली आहे का असा प्रश्न उपस्थित आहे.

Similar News