माझा पराभव करण्यासाठी विरोधकांनी मतदारांना मटण-दारू दिले : शालिनीताई

Update: 2018-12-22 11:59 GMT

'विधानसभेच्या निवडणुकीत माझा पराभव कऱण्यासाठी विरोधकांनी मतदारांना मटण, दारुच्या बाटल्या दिल्या. मात्र, ज्यांनी मटण खावून मतदान केले ते मटण बकऱ्याचेच होते का, असा मला प्रश्न पडला आहे', अशी टिप्पण्णी माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी केली.

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या, 2009 च्या निवडणुकीत ज्यांनी मटण खावून मतदान केले ते मटण बकऱ्याचेच होते का, असा मला प्रश्न पडला आहे. एवढी बकरी आली तरी कुठून..?. आमच्या एका कार्यक्रमासाठी आठ ते दहा बकरी हवी होती तर ती आम्हाला मिळाली नाहीत. आमचे कार्यकर्ते त्यासाठी आटपाडीला गेले आणि तेथून बकरी आणली. त्यामुळे या लोकांनी खाल्लेल मटण बकऱ्याचेच होते का, असा विचार कधी कधी मनात येतो. या लोकांना सर्व काही मिळाले. मात्र, गोरगरीब मतदारांना काय मिळाले. आता जे आहेत त्यांना कोणी पर्याय देवू शकत नाही का..?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Similar News