समाजामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सावित्रींच्या लेकींना बदलापूर येथे कायद्याने वागा लोकचळवळ आयोजित सावित्रीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या सावित्रींच्या लेखींशी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी सुसंवाद साधला असून त्यांच्या पुढील प्रवासाबद्दल जाणून घेतलं आहे. तसेच समाजात सावित्रींच्या विचारांचा वसा पुढे नेण्यासाठी लेक वाचवा, सावित्री विरुद्ध सावित्री असे नाट्य,कविता सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राज असरोंडकर यांनी केलं असून प्रमुख उपस्थिती प्रा. हरी नरके आणि प्रा. डॉ. वंदना महाजन यांची होती.