मोदीजी, महिलांचा सन्मान घरापासून सुरु होतो- राहुल गांधी

Update: 2019-01-10 11:30 GMT

काँग्रेसकडून महिलांचा सतत अपमान होत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली होती. त्यांच्या या टिकेला उत्तर म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून चांगलच उत्तर दिलंय. राहुल गांधी म्हणाले की, मोदीजी. आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरापासून सुरु होतोय असे म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना चांगलाच टोला लगावलाय. 'मोदीजी तुमचा संपूर्ण आदर ठेवत सांगतो, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरातून सुरू होतो. विषय भरकटवू नका. मी राफेल प्रकरणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

 

Similar News