प्रियंका गांधींचा लखनौमध्ये पहिला रोड शो 

Update: 2019-02-11 05:51 GMT

आज पासून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रियंका गांधींचा हा पहिला रोड शो आहे. तसेच त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि पश्चिम भागाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हेही असणारेय. प्रियंकाचा दौरा चार दिवसांचा आहे. लखनौमध्ये प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य शिंदे १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा असून, त्यातील ४२ जागांची जबाबदारी प्रियंका गांधींकडे आहे. त्या व ज्योतिरादित्य शिंदे प्रत्येक मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना भेटून तेथील स्थिती जाणून घेणार आहेत. उत्तरेच्या पूर्व भागातील वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असून, तेथे प्रियंका यांचा लोकसभा निवडणुकीत किती प्रभाव पडतो याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

काटेकी टक्कर ?

उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त खासदार लोकसभेत निवडून जातात. आगामी लोकसभा निवडणुकांत या राज्यातून आपले जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत म्हणून भाजप व काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेसला दूर ठेवून बसपा व सपाने युती केल्याने राज्यात चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिल्याने भाजप काहीसा चिंताग्रस्त झाला आहे.

Full View

Similar News