म्हणून प्रतिभाताई शिंदे ठरल्या या पुरस्काराचे मानकरी

Update: 2019-01-12 16:07 GMT

प्रतिभा शिंदे यांना तरुण भारत पर्यावरण रक्षक सन्मान 2018 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या सदस्या आणि लोक संघर्ष मोर्च्या च्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांना "तरुण भारत पर्यावरण रक्षक सन्मान 2018" हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दर पाच वर्षांनी हा तरुण भारत संघाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्काराच्या मानकरी प्रतिभाताई शिंदे ठरल्या आहेत. येत्या 15 जानेवारीला राजस्थानमधील तरुण भारत संघाच्या अलवर येथील आश्रमात हा पुरस्कार अरुण गांधी व तुषार गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

प्रतिभाताई शिंदे यांचे कार्य

प्रतिभा ताई शिंदे यांनी सातपुड्यातील आदिवासी समूहांना त्यांचे जल, जंगल, जमीन या वरचे हक्क मिळवून देण्यासोबतच हरित सातपुडा अभियाना अंतर्गत गेल्या वर्षांमध्ये सातपुड्यातील आदिवासी गावांमध्ये 6 लक्ष पेक्षा जास्त झाडांची लागवण केली असून ज्यात 60% पेक्षाही जास्त वृक्ष जगवली आहेत. त्याबरोबरच पाण्याचा समुचित वापर करून समृद्ध शेतीचे प्रयोग ज्यात आदिवासी बांधवांच्या 50 एकर शेतीत हळदीची यशस्वी लागवड ही त्यांच्या प्रयत्नांमधून सुरू आहे. वनहक्क कायद्याअंतर्गत केवळ शेतीचे पट्टेच मिळवून थांबायचे नाही तर या शेतीतून पर्यावरणपूरक शेती कशी करता येईल आणि ज्या गावांना सामूहिक जंगल त्यांच्या मालकीचे मिळाले या सामूहिक जंगलाचे पुनरुज्जीवन त्याचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी या सामूहिक वनांचा गावसहभागातून विकास कृती आराखडे बनवण्याचे कार्य ही प्रतिभाताईंच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

Similar News