आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांना शोधपत्रकारितेसाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यासंदर्भात एबीपी माझा या वृत्तवाहिनेचे पत्रकार वैभव परब यांनी प्राजक्ता पोळ यांच्याविषयी कौतुकास्पद फेसबुक पोस्ट केली आहे. पाहुयात... खालीलप्रमाणे
प्राजक्ता, जिंकलंस !
प्राजक्त पोळ पत्रकारितेतलं तसं तरुण नाव...
पण जिद्दीच्या जोरावर पोरीनं अवध्या काही वर्षातच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा उत्कृष्ट पत्रकिरितेचा पुरस्कार पटकावला. त्यामुळे प्राजक्ताचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मंत्रालय आणि विधिमंडळाचं वार्तांकन करणं म्हणजे एक कसोटी असते. शासकीय भाषा, शासकीय निर्णय शासकीय अधिकारी किंवा एकमेकांचे काटे काढणारे नेते, हे सर्व समजायला अनेकांची केस पांढरी होतात, पण पोरीनं कमाल केली. तरूणपणात मिळालेल्या संधीचं सोनं करत हे सर्व जरा लवकरच आत्मसात केलं आणि वेळोवेळी आपल्या पत्रकारितेला न्याय देण्याच्या प्रयत्न केला. प्राजक्ताच्या याच प्रामणिकपणामुळे तिच्या पाठीवर आज एक शाबसकीची थाप पडलीय.
ऑफिसातल्या जबाबदा-या, घरचा संसार आणि प्रचंड प्रमाणात करावं लागणारं ट्रॅव्हलिंग यामध्ये एका स्त्रीची काय अवस्था होते याची जाणीव सर्वांनाच आहे. पण या गोष्टीचा कुठेही बाऊ न करता, वेळीच मिळेल ते काम करण्याची जिद्द प्राजक्तामध्ये आहे. राजकीय पत्रकारिता करताना अनेक चांगले - वाईट अनुभव येत असतात. कोणाशी किती बोलावं? बातमी चालवण्यासाठी आपल्या खांद्यावर कोण बंदुक ठेवतंय? आपली बातमी आपल्या चॅनेलवरच पहिली कशी चालवी यासाठी ती सदैव प्रयत्नशील असते. कामगार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सातात्यानं समाजासमोर मांडण्याची ताकद तिच्या मनगटात आहे. या महाराष्ट्राला अनेक दिग्गज पत्रकारांचा वारसा आहे तो जोपासण्याची जबाबदारी आपल्यावर आहे या पुरस्कारानं आपली जबाबदारी आणखी वाढली आहे.
पत्रकारितेतली तुझी लेखणी सदैव तळपत राहो..
महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली आहेस,
महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास मोठा आहे,
येणा-या काळात आपणही या इतिहासाचा भाग असाल अशी कामगिरी कर..
तू लढवय्या आहेस, तू निर्भिड आहेस
तुझ्याकडून अशाच धडाकोबाज पत्रकारितेची अपेक्षा आहे
जे आढवे येतील त्यांच्यावर मात कर ,
जे साथ देतील त्यांना सोबत घेऊन चल,
पण महाराष्ट्राच्या मातीला शोभेल अशी कामगिरी करा !!
आमच्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहे.
https://www.facebook.com/100000297104185/posts/2265705816782633/