2016 साली महिला अधिकारी अश्विनी बिद्रे या बेपत्ता झाल्या होत्या. त्याचा छडा 2018 ला लावण्यात आला असून या प्रकरणातील आरोपीला आज अलिबाग कोर्टात हजर करण्यासाठी पोलिस नेत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत पोलिस संरक्षण असताना कशा पद्धतीने हा आरोपी आपल्या मैत्रिणीसोबत जेवणावर ताव मारत आहे हे पाहायला मिळतेय. महिला अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्येचा उलगडा ज्याने केला आणि गुन्हा कबूल केला तो महेश फळणीकरला अलिबाग कोर्टात हजर करण्यासाठी आणताना पोलिसांनी अक्षरश:पायघड्या घातल्यात. आरोपी महेश फळणीकर हा अश्विनी बिद्रे हत्याकांडातील महत्वाचा आरोपी आहे की ज्याने हे हत्याकांड कसे घडले हे पोलिसांना पुराव्यानीशी सांगितले आहे.
अशा आरोपीला घेवून जाताना पोलिसांनी आरोपीसाठी जे नियम असतात ते सर्व धाब्यावर बसविलेले दिसतात कारण जी माहिला या व्हिडिओत दिसते ती नातेवाईक नसून मैत्रिण आहे अशी माहिती मिळतेय.
आज ही अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपीना पोलिस राजरोस पणे मदत करित असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतेय. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा किंवा काद्याचा धाकच नाहीये. आणि पोलिसांनीही गुन्हेगारीला साथ देत आपले गुडघे टेकवले की काय असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय.