विखे पाटलांच्या सुनबाईंचा कोकण दौरा !

Update: 2018-12-06 13:12 GMT

कोकण म्हणजे असे ठिकाण जिथे जाण्याचा मोह कोणालाही न आवरण्यासारखा असतो. तसाच मोह झाल्याने आज अहमदनगर येथून तीन दिवसांचा दौरा करून सौ. विखे पाटील यांनी कोकणात हजेरी लावली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुनबाई धनश्री सुजय विखे पाटील यांनी कोकणातील रत्नागिरीला भेट दिली. यावेळी खास कोकणातील प्रसिद्ध सोलकढी बनवण्याची कला त्यांनी जाणून घेतली.

त्यांनी २५० महिलांसोबत हा कोकण दौरा केला. या महिला अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील लोणी येथील रणरागिणी महिला बचत गटाच्या होत्या. त्यांनी यावेळी गणपतीपुळेला भेट दिली. तेथे त्यांनी एकदिवसीय मुक्काम केला आणि त्यानंतर या गावातील सरस आणि यशार्थ कन्सल्टंन्सी यांच्या माध्यमातून बचत गटांचे छोटेसे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला देखील त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी आमरस व काजूच्या पसंती दर्शवली. धनश्री यांनी त्या महिलांचे कौतुक देखील केले. त्यांनी तेथील तुळजाभवानी बचत गटाच्या महिलांना भेटून जुवे गावातून तेजस एक्स्प्रेसमध्ये दिली जाणारी सोलकढी कशी बनवली जाते याची माहिती जाणून घेतली.

Similar News