शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्य सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अकरा जिल्ह्यांत किशोरवयीन मुलींसाठी केंद्र पुरस्कृत सुधारीत योजना राबविण्यात येणार असून, या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रुपयांवरुन साडेनऊ रुपये इतकी वाढ करण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.
योजनेमागील उद्देश
११ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलींचा विकास व्हावा यासाठी त्यांना पोषण आहार, तसेच आरोग्य, स्वच्छता, पोषण, प्रजनन व लैगिक आरोग्य, कटूंब याविषयी शिक्षण देणे हा या योजनेमागील उद्देश आहे.
कोणत्या जिल्ह्यात मिळणार मदत
या योजनेअंतर्गत ११ जिल्ह्यांचा समावेश असून यामध्ये बीड, नांदेड, मुंबई, नाशीक,गडचिरोली, बुलढाणा, कोल्हापुर, सातारा, अमरावती, नागपूर, आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे.