दिल्ली विधानसभेत आप सरकारने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या वादादरम्यान आप नेत्या अलका लांबा यांच्याकडून राजीनामा मागण्यात आला आहे. त्यांचे पार्टीतील सदस्यत्वही रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अलका लांबा यांनी संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. यामुळे लांबा यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, राजीव गांधी यांच्याविरोधात पार्टीनं मांडलेल्या प्रस्तावासंबंधी अलका लांबा नाराज होत्या. अलका लांबा यांनी आपच्या भूमिकेविरोधात जाऊन सोशल मीडियावर संबंधित प्रस्तावाची माहिती शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली. यावरुन पक्षाचे नेतृत्व लांबा यांच्यावर नाराज झाले. दुसरीकडे, पार्टीनं मांडलेल्या प्रस्तावाचा विरोध दर्शवत वॉक ऑउट केल्याचा दावा लांबा यांनी केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता अरविंद केजरीवाल पक्षातील सदस्यांचे व्यक्ति स्वतंत्र हिरावून घेत आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होतोय.
https://twitter.com/LambaAlka/status/1076169781324251136
काय आहे प्रकरण?
आपने विधानसभेमध्ये राजीव गांधी यांच्यामुळे शीख दंगल उसळली होती. ते या दंगलीला जबाबदार होते. यामुळे त्यांना देण्यात आलेला देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न काढून घेण्यात यावा, असा प्रस्ताव आपने शुक्रवारी मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला. परंतु आपच्या नेत्या या प्रस्तावावरुन नाराज असून त्यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली असून आप ने त्यांच्या या वर्तवणूकीमुळे त्यांची हक्कालपट्टी केली आहे. यावरुन अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचा खरा चेहरा आणि महिलांविषयीचा आदर सगळ्यांसमोर आला आहे.
कोण आहेत अलका लांबा?
अलका लांबा या आपच्या प्रवक्त्या राहिल्या आहेत.
कायम लाइम लाइटमध्ये राहाण्याची त्यांना आवड
वादांशी अलका लांबा यांचे जुने नाते आहे.
त्यांचे लग्न दिल्लीतील लोकेश कपूरसोबत झाले होते.
त्यांना ऋतिक नावाचा एक मुलगा आहे.
बेस्ट अॅथलिट आणि बेस्ट लिडर
अलका यांनी दिल्ली विद्यापीठाची निवडणूक जिंकून नाव कमावले होते. त्यांचे शिक्षण दयालसिंह कॉलेजमधून झाले. 1995-96 मध्ये त्या बेस्ट अॅथलिट होत्या. त्याच वर्षी त्यांना दिल्ली विद्यापीठाचा बेस्ट लिडर पुरस्कार मिळाला होता. अलका या स्टाइलीश लिडर म्हणून चर्चेत असतात. त्यांची वकृत्वशैली प्रभावी आहे. काँग्रेसमध्ये असताना त्या महिला आयोगाच्या सदस्य होत्या.
अलका लांबा यांचा राजकीय प्रवास
- दिल्ली विद्यापीठातून 1994 मध्ये विद्यार्थी नेता म्हणून सुरुवात. नॅशनल स्टुडंट यूनियन ऑफ इंडिया (NSUI) मध्ये प्रवेश करुन दिल्ली प्रदेशच्या महिला विभागाची जबाबदारी सांभाळली.
- एक वर्षानंतर दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संसद निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणूकीत मोठ्या बहुमताने विजयी.
- 1997 मध्ये ऑल इंडिया NSUI अध्यक्षपदी निवड. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती.
- 2002 मध्ये मुख्य राजकीय प्रवाहात आल्या. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती.
- 2003 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी दिल्लीतील मोतीनगर येथून भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराना यांच्याविरोधात निवडणूक लढवली.
- 2006 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती.
- 2013 मध्ये काँग्रेस सोडून आपमध्ये प्रवेश.
- सध्या दिल्लीतील चांदनी चौक या मतदार संघातून आपच्या आमदार