बीडमधील आँनर किलींग प्रकरणी एका आरोपीला अटक...

Update: 2018-12-24 12:50 GMT

गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या बीडमधील घटनेतील एका आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. बहिणीने प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या भावाने आपल्या मेहुण्याची हत्या केली होती. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या हत्येमध्ये आरोपी बालाजी लांडगे याने आपल्या मित्रांच्या मदतीने मेहुणा सुमित वाघमारे याची हत्या केली होती. त्यामधील आता पोलीसांनी कारवाई करुन कृष्णा क्षीरसागर या आरोपीला अटक केली आहे. आरोपी कृष्णा याने बालाजी लांडगेला सुमितच्या हत्येमध्ये सहकार्य केल्याचा आरोप आहे. अद्याप मुख्य आरोपी बालाजी लांडगे व संकेत वाघ हे फरार आहेत. पोलीसांचा तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण वाचा सविस्तर-

भयंकर धक्कादायक, बीडमध्ये सैराटची पुनरावृत्ती...

Similar News