मायावती, ममताही लावणार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती

Update: 2018-09-09 08:46 GMT

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १७ ते १९ सप्टेंबरपर्यंत दिल्लीत कार्यक्रम आयोजीत केला आहे. ‘भविष्यातील हिंदुस्थान : संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

राजधानीतील विज्ञान भवनात पार पडणार संघाचा हा कार्यक्रम तीन दिवस असणार आहे. या कार्यक्रमास अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, मायावती, अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासहित प्रादेशिक पक्षांच्या अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Similar News