शुक्रवार दिनांक ११ जानेवारीला अ.भा. मराठी साहित्य संमेलनला सुरुवात झाली. या संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे आणि संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, आणि शुक्रवारी या दोघींचे भाषण झाल्यानंतर मँक्सवुमन फेसबुक पेजवरुन आम्ही एक पोल प्रश्न केला होता. यावर सर्व नेटिझन्सने आपले मत देत वैशाली येडे यांच्या भाषणाला पसंती दिली आहे. सर्वाधिक प्रभावी भाषण म्हणून ६० टक्के लोकांनी त्यांना पसंती दर्शवत संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांना ४० टक्के लोकांनी मतं दिली आहे.