...त्यामुळे भाजपची सत्ता येणे आवश्‍यक आहे - पंकजा मुंडे

Update: 2018-12-03 08:33 GMT

नगरमध्ये भाजपच्या वतीने महिला मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर नाव न घेता टिका केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष खा. दिलीप गांधी, माजी उपमहापौर गीतांजली काळे, सुनील रामदासी, छाया राजपूत आदीं सह भाजपचे उमेदवार व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

त्या म्हणाल्या की, "नगर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. रात्री-अपरात्री महिलांना पाणी भरण्यासाठी उठावे लागते. त्यामुळे नगरमधील मुलांना कुणी मुली देण्यास तयार नाही. एखादी मुलगी नगरमधून बाहेर लग्न होऊन चालली की सुटले या त्रासातून असे म्हणत आनंदाने जाते. शहरात शिस्त नसल्याने ही परिस्थिती आहे" असे देखील त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, "महिलांना शहरात मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. महिला, मुलींना सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यामुळे भाजपची सत्ता येणे आवश्‍यक आहे."

"मोदींनी बेटी बचाव, बेटी पढाव'चा नारा दिला. देशातील सर्व महत्वाची खाते महिलांकडे दिली आहेत. शासनाने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न केले. महिला बचत गटांची योजना शहराच्या बचत गटांसाठीही लागू करणार आहोत. यातून शहरातील महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळेल. महिला सक्षम करण्याचं काम आम्ही करतोय. विकास ओटीत घेण्यासाठी महिलांनी आतापासूनच तयारी करावी," असे आवाहन पंकजा मुंडेंनी यावेळी महिलांना केले.

Similar News