…हीच का महिला समानतेची क्रांती?

Update: 2019-01-02 06:25 GMT

शबरीमाला मंदिर, शनि मंदिर अशा अनेक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळावा यासाठी महिलांनी मोठा लढा उभारला. महिलांच्या या लढ्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. कायद्यानुसार महिलांना मंदिरात प्रवेश करण्याचा मार्ग सोपा झाला. आणि सगळीकडे एकच सूर निर्माण झाला तो म्हणजे महिला समानतेची क्रांती झाली. महिलांनीही जल्लोष केला. मात्र यापलिकडे जर आपण विचार केला तर महिलांना मंदिर प्रवेश मिळणं हीच का आजच्या काळातली महिला क्रांती... हा प्रश्न काही महिलांना विचित्रही वाटेल मात्र मंदिरात जाऊन फक्त देवाचे दर्शन केल्यास सर्व काही मिळालं असं आहे का?...

महिलांनी आपल्या हक्कांसाठी लढावं आणि स्वतःचा हक्क मिळवावा यात काही गैर नाही. मात्र एका मंदिरांच्या प्रवेशासाठी देशभरातील महिलांना एकत्रित यावं लागतेय यावर थोडी शंका निर्माण होतेय, कारण जर हाच लढा महिलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात असता तर नक्कीच बरं वाटलं असतं आणि आजच्या काळानुसार ते शोभलंही असतं.

महिलांनी स्वतःला निर्भय आणि धाडसी बनवलं पाहिजे.. मंदिर प्रवेश करणे म्हणजे इतिहास रचने होय का... तर माझ्यामते हा निव्वळ महिलांना देवधर्माच्या कचाट्यात अडकवणारी खेळी असावी. महिलांनी देव-देवितांच्या भक्तीतून माघारी येऊच नये यासाठी हा लढा असावा.

आजच्या काळात अनेक महिला विविध स्तरांवर जाऊन आपलं नाव चमकवलं आहे तर दुसरीकडे देव-धर्माच्या विळख्यात अडकून राहिलेल्या महिलांनी स्वतःची प्रगती थांबवली आहे असं मला वाटतेय.

"असा देव काय कामाचा जो स्त्री-पुरुष समानता मानत नसेल.

देवांसाठी उभारलेला लढा महिलांना खरचं सक्षम करणारा आहे का?"

- प्रियंका आव्हाड

Full ViewFull View

Similar News