२०१९ ची निवडणूक लढवणार नाहीत असं इंदूरमध्ये पत्रकार परीषदेत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज म्हटले. इंदूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्या असताना त्यांनी ही घोषणा केली. निवडणूक न लढवण्यामागचं कारण सांगताना सुषमा स्वराज म्हणाल्या, आरोग्याची काळजी घ्यायची असल्याने सुषमा स्वराज यांनी हा निर्णय घेतला आहे.
- सुषमा स्वराज या हरियाणातील अंबाला केंटच्या रहिवासी आहेत.
- त्या पेशाने वकील असून नंतर राजकारणात आल्या.
- त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री सुद्धा होत्या .
- मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून खासदार आहेत.
- यांचे वडील आरएसएसच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होते.
- यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सूचना आणि प्रसारण मंत्रिपदाचा पदभार सांभाळला होता.
- एक उत्तम वक्ता म्हणून सुषमा स्वराज यांची ओळख आहे.