युतीसाठी आम्ही सदैव तयार आहोत,युती झाली तर आम्ही सेनेला विजयी करण्यासाठी प्रयत्न करु आणि नाही झाली तर भाजप ला विजयी करू अशी सावध प्रतिक्रिया ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे ... त्या आज लातूर जिल्ह्यातील औसा पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उदघाटन प्रसंगी शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होत्या.