‘त्या’ जर मुख्यमंत्री झाल्या तर मला आनंदचं – सुप्रिया सुळे

Update: 2019-02-24 06:10 GMT

आगामी निवडणुकांचे पडघम वाजल्याने अनेक राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. यंदाची निवडणुक चांगली रंगत होणार असल्याचे पाहायला मिळतेय कारण यंदा मुख्यमंत्री पदासाठी महिला लोकप्रतिनिधींची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच मॅक्समहाराष्ट्रने काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा होत असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती... त्यावर राज्याला महिला मुख्यमंत्री मिळणार अशा चर्चेला उधाण आलं होतं. नुकतेच राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे नेतृत्व कोणतीही धाडसी महिला करायला पुढे येत असेल तर आपल्याला आनंदच आहे यामुळे पंकजा मुंडे या मुख्यमंत्री झाल्या तरी मला चालेल. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुक्याच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.

Similar News