गेल्या अनेक वर्षांपासून महिला आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे याचा सूर अनेक राजकीय नेतेमंडळी करित असून अद्यापही ही मागणी प्रलंबित आहे. निजामाबादच्या खासदार कल्वाकुंटला कविता यांनी यावर भाष्य करताना म्हटलं की, मागास वर्गीय सर्वणांनां १० टक्के आरक्षण मंजूर केलं आहे त्याचप्रमाणे महिलांना 33 टक्के आरक्षण ही मंजूर करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाल्या कविता...
मागासवर्गीय सर्वणांना 10 टक्के आरक्षण मिळण्याचे विधेयक ज्या दिवशी लोकसभेत मांडण्यात आले त्या दिवशीच हे विधेयक मंजूर झाले, तसेच दुसऱ्या दिवशी राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. अशाच पद्धतीने महिला आरक्षण विधेयकही लवकर मंजूर झाला की देशभरातील महिलांचे कल्याण होईल असं कविता यांनी म्हटलंय..