धनगर आरक्षण :मंत्रालयात प्रवेश न करण्याची घोषणा करणाऱ्या पंकजा मुंडेंचा यू टर्न

Update: 2019-01-08 10:36 GMT

धनगर आरक्षण मिळेपर्यंत मी मंत्रालयात प्रवेश करणार नाही, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा इथे आयोजित धनगर समाज मेळाव्यात बोलताना केली होती. मात्र, आज पंकजा मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आल्या असत्या त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांनी मंत्रालयाच्या गेटवरच अडवले.

मात्र, पंकजा मुंडे यांनी आता यू टर्न घेतला आहे. आपण असं वक्तव्य केलंच नसल्याचं स्पष्टीकरण पंकजा यांनी दिलंय.

काय म्हटलंय पंकजा यांनी...

‘आम्ही पुन्हा सत्ता प्रस्थापित करणार आहोत पण त्या सत्तेत विराजमान होत असताना धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही’ या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. आमदार रामराव वडकुते यांनी मला रोखण्यापेक्षा गेल्या ७० वर्षात जे धनगरांना आरक्षण देऊ शकले नाहीत त्यांना रोखावं. ते ज्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत त्यांनी का नाही धनगरांना आरक्षण दिले? असा सवाल करत, मला रोखल्याने धनगर आरक्षण मिळणार असेल तर मला खुशाल रोखावं, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले आहे.

या धनगर आरक्षण मेळाव्याला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. राष्ट्रवादी काँग्रेसनेही धनगर आरक्षण मेळाव्याचं आयोजन केलं होतं, मात्र राष्ट्रवादीचा कुणीही बडा नेता माळेगावला आला नाही.

पहा हा व्हिडीओ :

https://youtu.be/rqnnixzGfes

 

 

 

 

 

 

 

Similar News