राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेस जनतेला सरकारविरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असून त्यांना सर्वोच्च न्यायालय ही खोटं वाटू लागले असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राफेल विमान खरेदीसंदर्भात काँग्रेस लावलेल्या सगळ्या आरोपांना फेटाळून मोदी सरकारला क्लीन चीट दिली होती. परंतु काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खोटा वाटत आहे. आज भाजप देशभरातून ७० ठिकाणी पत्रकार परिषदा घेत आहेत. या परिषदेच्यामार्फत ते राफेल विमान खरेदी प्रकरणातील आपलं म्हणंण जनतेसमोर मांडणार आहे. मुंबई भाजपा कार्यालयात आज निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आपली बाजू मांडली आहे.
पत्रकार परिषदेतील मुद्दे
न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेस समाधानी नाही.
राफेल विमान खरेदी प्रकरणात कोणताही घोळ नाही.
काँग्रेस हे जनतेला सरकारविरोधात भडकवत आहे.
तसेच न्यायालयाचा निर्णय ही त्यांना खोटा वाटू लागलाय.
आम्ही कॅगला राफेल विमान खरेदची किंमत पाठवली आहे.
राफेल विमानाची किंमत सार्वजनिक करण्यासाठी काही संसदीय प्रक्रिया आहे त्याची सुरुवात केली आहे.