संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता मिलिटरी पोलिसांत 20 टक्के महिलांची जवान म्हणून भरती होणार आहे.
आज बदललेल्या काळात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र लष्करामधील सैनिकी विभागात आतापर्यंत प्रवेश दिला जात नव्हता. पण आता महिलासुद्धा लष्कराच्या सैनिकी विभागात भरती होऊन शत्रूशी दोन हात करताना दिसणार आहेत. महिलांना लष्करातील सैनिकी विभागात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतला आहे. आता महिलांनाही लष्कराच्या सैनिकी विभागात सामावून घेतले जाणार आहे. संपूर्ण प्रक्रियेंतर्गत 20 टक्के महिलांना सैनिकी विभागात प्रवेश दिला जाईल.