पॉप्युलर असल्यामुळे कधी कधी माणसं जमीनीवरुन हवेत उडायला सुरुवात करतात असं फक्त ऐकून होते मात्र आता ते हार्दिक पंड्याच्या महिलांविषयी वक्तव्यावरुन प्रत्यक्षातही पाहायला मिळालय. पॉप्युलर होणं आणि त्याचा गैरवापर करुन कुठलीही वक्तव्य करणे हे हार्दिक पंड्याला चांगलचं महागात पडल आहे.
झालं असं की २५ वर्षीय ऑलरांउडर खिलाडी हार्दिक पंड्या याने करण जोहर च्या सेलिब्रेटी कॉफी विथ करण या चॅट शो मध्ये महिलांविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सने हार्दिक पंड्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. हार्दिक पंड्यांच्या महिलांविषयी वादग्रस्त विधानानंतर नेटिझन्सने टीकेची तोफच डागली. तसेच BCCI मधील प्रशाकीय समिती COA ने हार्दिक पंड्या आणि केएल राहुल ला या वक्तव्यावर कारणं सांगा अशी नोटिस बजावली आहे.
हार्दिक पंड्या नेमका काय बोलला? पाहा हा व्हिडीओ
https://twitter.com/twitter/statuses/1082003121038114818
तसेच रिलेशनशिप, डेटिंग आणि महिलाविषयी अनेक मुद्द्यावरुन टिप्पणी केली. पंड्याने वादग्रस्त विधान केल्यानंतर नेटिझन्सने त्याला चांगलच झापल्यानंतर ट्वीटरवरुन त्याने केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. कॉफी विथ करण मध्ये मी केलेल्या वक्तव्यावरुन ज्यांना मी दुखावल आहे त्या सगळ्यांची मी माफी मागतो. तसेच मी बोलता बोलता जास्त बोलून गेलो मात्र मात्र हेतू कुणालाही दुखवण्याची इच्छा नव्हती. असं म्हणतं त्याने माफी मागितली आहे.
https://twitter.com/hardikpandya7/status/1082823344662171649