राष्ट्रीय बाल सुरक्षा योजनेसाठी केंद्र सरकारने बुधवारी ड्राफ्ट जारी केला आहे. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी यापुढे विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे बाल सुरक्षे संदर्भात संमतीपत्रही द्यावं लागेल अशी तरतूद या योजनेत करण्यात येणार आहे.
महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या या ड्राफ्टवर 4 जानेवारी पर्यंत देशातील सर्व संस्था, कार्यालये, माध्यमं यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत. लहान मुलांवरील अत्याचार, शोषण, लैंगिक अत्याचार तसंच इतर बाबींवर या ड्राफ्ट मध्ये विचार करण्यात आला आहे. लहान मुलांना सुरक्षित वातावरण मिळावं हा या योजनेचा हेतू असून खालील लिंकवर या ड्राफ्टबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे.
http://www.wcd.nic.in/sites/default/files/Download File_1.pdf