फुलराणी सायना नेहवालने ३६ वर्षांनंतर बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीतील पहिले पदक जिंकून इतिहास रचला आहे. सायना नेहवालने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रॅचनोक इन्तॅनोनला पराभूत केले होते .परंतु उपांत्य फेरीत जागतिक क्रमावारीत अव्वल असलेल्या चायनीज तैपेईच्या ताय त्झुंयिंगकडून तिला सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला आणि तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. १९८२ नंतर भारताला बॅडमिंटन एकेरीतील स्पर्धेत कांस्यपदक मिळाले.