बीड ऑनर किलींगचा मुख्य आरोपीला अटक...

Update: 2018-12-25 07:03 GMT

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीडमधील सुमित वाघमारे ऑनर किलींग प्रकरणी आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बालाजी लांडगे व संकेत वाघ अशी त्यांची नावं असून त्यांना अकोला परिसरातून अटक करण्यात आली आहे.

कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात बहिणीशी प्रेमविवाह केल्यानं संतापून बालाजी लांडगे यानं सुमित वाघमारेचा खून केला होता. मागील आठवड्यात ही घटना घडली होती. या प्रकरणी कृष्णा क्षीरसागर या आरोपीला पोलिसांनी रविवारीच अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि वाघ हे दोघे गेल्या पाच दिवसांपासून फरार होते. पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. अखेर सहा दिवसांनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

Full View

काय आहे प्रकरण वाचा सविस्तर-

भयंकर धक्कादायक, बीडमध्ये सैराटची पुनरावृत्ती...

बीडमधील आँनर किलींग प्रकरणी एका आरोपीला अटक...

 

Similar News