अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आलं ही मंडळ आयोजकांची मोठी चूक असल्याचे म्हणत निषेध नोंदवला आहे. अशा साहित्यबाह्य झुंडशाही आपण (संयोजकांनी) झुकणं बंद केलं पाहिजे. तसेच त्यांनी या घडलेल्या प्रकाराला शासन जवाबदार नाही असं म्हटलं आहे. जगभरातील साहित्यिकांसाठी मराठीची दारं नेहमी खुली असणार आहे असं ढेरेंनी म्हटलं आहे. तसेच सहगल यांच्या प्रकरणानंतर कुणी भावना भडकवता कामा नये असंही त्यांनी म्हटलं आहे.