औरंगाबाद तालुक्यातील सिल्लोड मध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 12 शे स्केवर फुटाच्या जागेसाठी एका महिलेला नग्न करून जबर मारहाण करण्यात आली. अंगावर कपडे नसल्याने ग्रामस्थ त्या महिलेला झाकण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींनी ग्रामस्थांना पिटाळून लावले. पीडित महिला सिल्लोड ग्रामीण पोलीस मध्ये होमगार्ड पदावर काम करते.
काय आहे नेमकं प्रकरण?
पीडित महिलेच्या आईच्या नावावर असलेल्या जागेवर तिच्या चुलत्यांचा डोळा आहे. त्यामुळे पीडित महिला आणि तिची वयोवृद्ध आईला जागेवरून पिटाळून लावण्यासाठी आरोपी धनंजय वाघ, मुरलीधर वाघ, बाबुराव वाघ, रामदास वाघ यांनी पीडितेला नग्न करून मारहाण केली. आरोपींचे नातेवाईक सिल्लोड पोलीस ठाण्यात असल्याने आरोपींवर कारवाई अद्याप झालेली नाही असा आरोप महिलेने केला आहे.
https://youtu.be/UZ1GsfC3P-8