अश्विनी पाटील यांनी साकारलं शहीद पतीचं स्वप्न 

Update: 2019-02-15 12:02 GMT

दहशतवाद्यांशी लढतांना शहीद झालेल्या पतीच्या दुःखातून सावरत तिनं पतीचं स्वप्न पूर्ण केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील माळसा बेलेवाडी इथले सातप्पा महादेव पाटील यांचं ११ ऑक्टोबर २०१३ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढतांना वीरमरण आलं होतं. त्या दुःखातून सावरतच शहीद पाटील यांची वीरपत्नी अश्विनी यांनी पतीचं एक स्वप्न नुकतंच पूर्ण केलंय. सातप्पा पाटील यांना मासा बेलेवाडी या आपल्या गावी शाळा सुरू करायची होते. हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांना वीरमरण आलं. त्यामुळं पतीचं हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनी यांना सहा वर्ष लागली.

https://twitter.com/adgpi/status/1096297386953998336

सातप्पा यांचा २०१२ मध्ये अश्विनी यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०१३ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढतांना सातप्पा शहीद झाले. या दुःखातून सावरत शहीद झालेल्या पतीचं शाळेचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानं अश्विनी यांनी प्रयत्न सुरू केले आणि सहा वर्षांनंतर त्यांनी शाळा सुरू केली. नुकतंच या शाळेचं उद्घाटनंही झालंय. ही शाळा सुरू होणं हीच माझ्या पतीला माझी श्रद्धांजली, या शब्दात अश्विनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शहीद जवान सातप्पा पाटील विद्यालय म्हणजे अश्विनीच्या दृढनिश्चयाचं, त्यागाचं रूप आहे. अश्विनी सध्या निपाणी इथं नोकरी करतात, त्यातून पैसे साठवून त्यांनी याच शाळेच्या उभारणीसाठी दोन लाख रूपयांचा निधी दिला आहे, हे विशेष. अशा या वीरपत्नीला मॅक्सवुमनचा सलाम...

Similar News