राळेगणसिद्धी येथे आज पाच दिवस झाले अण्णाचे उपोषण सुरू आहे. अण्णांचे उपोषण सुरू झाल्यापासून गावातील नागरिकांनी अण्णांना पाठिंबा म्हणून पाच दिवसापासून त्यांच्या सोबत आहे. अण्णांच्या उपोषणाला अनेक लोक येऊन भेट देत आहे मात्र आज एक अशी व्यक्ती त्यांना भेटायला आली होती ती म्हणजे त्यांची लहान बहीण ताराबाई नरवडे. विशेष म्हणजे ज्यावेळी अण्णा उपोषणाला बसले होते याबाबतची कोणतेही कल्पना त्यांची बहीण ताराबाई यांना नसल्याचे त्यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितले ज्यावेळी अण्णा उपोषणला बसले त्यावेळी त्या त्रंबकेश्वर ला दिंडीला गेले होते. आज त्या दिंडीहुन गावात परत आल्यानंतर त्यांना अण्णांच्या उपोषणाची माहिती मिळाली.
मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना ताराबाई यांनी आपल्या काही आठवणींना वाट मोकळी करून दिली, अण्णा यांचा स्वभाव खूप कडक असून त्यांना घरात बोलण्याची कुणाची हिम्मत होत नाही. तसेच नवाब मालिकांच्या पैसे घेण्याच्या वक्तव्यबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की आम्हाला अण्णा वर खूप विश्वास असून असे आरोप करणे बरोबर नाही. आमच्या भाऊचा जन्मच देशाच्या हितासाठी झाला असून याचा आम्हाला अभिमान आहे.