आता साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेच्या हस्ते

Update: 2019-01-10 15:07 GMT

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार होते मात्र काही कारणास्तव त्यांचे नाव रद्द करण्यात आले होते मात्र आता नवीन उद्घाटकाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या संमेलनाची सुरुवात उद्या ११ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजूर येथील आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली सुधाकर येडे यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत मराठी साहित्य महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षा विद्या देवधर यांनी सांगितले आहे.

कोण आहेत वैशाली येडे?

वैशाली येडे या सध्या अंगणवाडी मदतनीस म्‍हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शेतकरी पतीने सात वर्षांपूर्वी नापिकीमुळे आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले आहेत. पतीच्या पश्चात वैशाली येडे यांनी मोठ्या हिंमतीने उभे राहून समाजाला वेगळी दिशा दिली. त्यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. साहित्य महामंडळ आणि आयोजकांच्या दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Similar News