अखेर शेतकऱ्यांच्या लेकींचं आंदोलन मागे

Update: 2019-02-09 09:13 GMT

गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेलं पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन अखेर शनिवारी (9 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले आहे. पशुसंवर्धन पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून आंदोलनादरम्यान झालेल्या दडपशाहीच्या प्रकारची चौकशी करणार असल्याची माहिती खोतकर यांनी दिली. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दोन दिवसांनी 11 फेब्रुवारीपासून अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांच्या लेकींनी दिला आहे.

 

 

Similar News