जोडप्यांना मुले न होण्यामागे अनेक कारणे असतात. मात्र, त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे पुरुषातील वंध्यत्व हे आहे. नुकत्याच अमेरिकेत झालेल्या एका सर्वेक्षणातुन समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुले न होणा-या एकूण जोडप्यात पुरुषांचे वंध्यत्व कारण असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आपल्याकडे साधारण मुलं न होण्याला स्त्रियांना जबाबदार धरले जाते, पुरुषांमध्ये दोष असताना देखील पुरुष स्त्रियांनाच दोष देत असतात. वंध्यत्व आलेले पुरुष अनेकदा ही समस्या सरळ पुरुषत्व या संकल्पनेशी जोडतात. त्यामुळे ते खचुन जातात. उपचार घेतांनाही या समस्यांचा त्यांच्यावर ताण येत असतो. त्यामुळे अनेक पुरुष वंध्यत्वावरील उपचार देखील घेत नाहीत. अमेरिकेतील आकडेवारी असली तरी, भारतातील सामाजिक परिस्थिती पाहता भारतीय पुरुषांवरही वंध्यत्वाचा ताण असतोच हे नाकारता येत नाही. मात्र, पुरुषांनी वंध्यत्वाने खचुन न जाता योग्य उपचार घेतल्यास वंध्यत्व जाते.