गोदी पत्रकार दिपक चौरासीयाला नेमकं काय झालं ?
गोदी पत्रकार दिपक चौरासीयाला नेमकं काय झालं ?;
पत्रकारांनी समाजाला आरसा दाखवणं अपेक्षित असतं. परंतू अलिकडच्या काळात गोदी मिडीयाच्या पत्रकारीतेनं मर्यादा सोडली आहे. देशभर पहीले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अंतयात्रेचं प्रक्षेपण सुरु असताना न्युजनेशन वाहिनीचे पत्रकार दिपक चौरासीया असंबंध्द बोलताना दिसून आले आहे. या संवादाचा व्हिडीओ आता समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्करी हेलिकॉप्टर कोसळून अपघात झालेल्या सीडीएस जनरल बीपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला होता.त्यांचे पार्थिव नवी दिल्लीत आणले असताना मान्यवर त्यांचे अंतिम दर्शन घेत होते. त्यावेळी न्यूज नेशन वाहीनीवर लाईव प्रक्षेपण सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला.
हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या मनात प्रश्न उपस्थित राहतो. दिपक चौरसिया यांना नक्की काय झालंय? बिपीन रावत यांच्याबाबत बोलत असताना ते असंबंद्ध बोलताना स्क्रीन वर दिसले आहे. त्यांनी त्यांच्या शो मध्ये बिपीन रावत यांचा जनरल V.P. Singh असा देखील उल्लेख केला आहे. जनरलला ते जर्नालिस्ट असंही संबोधत आहेत. वेगानं हा व्हिडीयो व्हायरल झाला आहे.
यावर समाजमाध्यमातही विविध प्रतिक्रीया येत असून अनेकांनी या असंबंध्द भाषेबद्दल आश्चर्य, निषेध आणि संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांची तब्बेत तर ठिक नाही ना असा प्रश्न केला आहे. काहींनी सर्व नोईडा मिडीयाची अवस्था अशीच झाल्याचं म्हटलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे यासंदर्भात आणखी एक ट्विट व्हायरल होत आहे. यामध्ये दीपक चौरसिया यांनी एका लग्नात सहभागी होऊन भरपूर दारु प्यायले आणि त्याच अवस्थेत त्यांनी स्टुडिओमध्ये येऊन अँकरिंग केल्याचा आरोप या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.
— Sunil Rajbhoi (@SunillRajbhoi) December 10, 2021