राजस्थान: मुख्यमंत्री बदलणार? सचिन पायलट यांनी घेतली राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट
राजस्थान: मुख्यमंत्री बदलणार? सचिन पायलट यांनी घेतली राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट Rajasthan next? Or Rajasthan Cabinet reshuffle Congress's Rahul Gandhi, Priyanka meet Sachin Pilot, days after Punjab leadership change;
पंजाबमध्ये झालेल्या नेतृत्व बदलानंतर राजस्थान मध्ये देखील नेतृत्व बदल केला जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. या एका आठवड्यामध्ये त्यांची ही दुसरी भेट आहे. दरम्यान, गुजरात मध्ये सचिन पायलट यांना संघटनात्मक पद मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणूक कॉंग्रेससाठी महत्त्वाची आहे. त्याची रणनिती ठरवण्याचं काम सचिन पायलटकडे दिलं जाण्याची शक्यता आहे.
मात्र, 44 वर्षीय पायलटने काँग्रेसच्या गुजरात मोहिमेचे व्यवस्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे का? हे अद्याप माहित नसले तरी, पायलटची राजस्थानमध्ये स्वतःची महत्वाकांक्षा आहे, जिथे 70 वर्षीय अशोक गेहलोत मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, पायलट आपले विश्वासू राजस्थानच्या मंत्रिमंडळात सामील होण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळं पुढील काही दिवसात मंत्रीमंडळ विस्तार होण्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.
तसेच यापूर्वी, 17 सप्टेंबर ला झालेल्या बैठकीत राजस्थानमध्ये काँग्रेसला बळकटी देण्याबरोबरच, सचिन पायलटच्या यांच्या राजकीय भूमिकेवर दीर्घ चर्चा झाली. या दरम्यान, सचिन पायलट यांना काँग्रेसने मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन दिले आहे आणि ते आश्वासन पूर्ण केले जाईल. असा शब्द कॉंग्रेस नेतृत्वाने दिल्याने पायलट गटात आनंदाचं वातावरण आहे.
दरम्यान, कॉंग्रेस हायकमांड इतर राज्यांमध्येही अशा बदलांच्या प्रयत्नांत आहे. मात्र, हे कधी आणि कसं होईल, याबाबतचा रोडमॅप अद्याप तयार झालेला नाही. काँग्रेस हायकमांड नेतृत्व बदलण्याच्या किंवा राजस्थान सरकारमध्ये कोणत्याही मोठ्या फेरबदलाच्या मूडमध्ये नसलं तरी उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांवर सर्व लक्ष केंद्रित करू इच्छित असल्याचं सुत्रांनी दिलेल्या माहितीत समोर आलं आहे. मात्र, 5 राज्यांच्या निवडणुकानंतर राजस्थानबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Sachin Pilot, Rahul Gandhi, priyanka gandhi, Cabinet reshuffle