विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं पहिल्याच दिवशी विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले. यावेळी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी मॅक्स महाराष्ट्राला Exclusive माहिती दिली आहे.
सुनील प्रभू म्हणाले की, " महाराष्ट्रावर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. यासंदर्भातला प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलाय. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव नाकारलाय. त्यामुळं शिंदे- फडणवीस- पवार सरकार हे शेतकऱ्यांच्याबाबतीत संवेदना नसलेलं सरकार असल्याची टीका आमदार प्रभू यांनी केलीय.