मुंबईतील चुन्नाभट्टी येथे टाटानगर मधील स्वदेशी मिल या इमारती मध्ये मिल कामगार अनेक वर्षांपासुन राहतात, ह्या इमारतीला सत्तर ते ऐंशी वर्ष पुर्ण झाली आहेत. पण सध्या ही इमारत पुर्णपणे मोडकळीस आलेली आहे. या इमारतीतील रहिवासी आपला जीव मुठीत धरुन येथे राहत आहेत. यापुर्वी ही माध्यमांनी इमारतीची मोडकळीस आलेली अवस्था दाखवलेली होती, परंतु आमच्याकडे बीएमसी (BMC) ने पुर्णपणे दुलर्क्ष केलं आहे, असं य़ेथील स्थानीक लोकांनी म्हटलं आहे. येत्या दहा तारखेपर्यंत बीएमसी ने काहीतरी तोडगा काढण्याचं आश्वासन येथील स्थानिक लोकांना दिलं आहे. पावसाळ्यात काही घरात भिंती ओल्या असल्यामुळे विद्युत प्रवाहाचा करंट लागतोय. परंतु बीएमसी आणि स्थानिक प्रशासनाने आमच्याकडे सतत दुलर्क्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या या इमारतीची काय अवस्था आहे? पाहा व्हिडीओ...
https://youtu.be/bJe5oa-_PQ0