महाराष्ट्राची हळद 'कात'टाकणार का?
वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या हळदीसारख्या नगदी पिकाच्या लागवडीपासून तर मार्केटिंग पर्यंतच्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आहे मॅक्स किसानचे संपादक विजय गायकवाड यांनी...
हळदीचे भाव ऐतिहासिक वाढले आहेत. शेतीमातेची आणि बाजाराची परिस्थिती पाहता हळदीचा क्विंटलचा भाव 23 हजारापर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. हळद उत्पादक शेतकरी आणि इंडस्ट्री यांना धोरणात्मक पाठबळ देऊन हळदीसाठी सोन्याचे दिवस येतील असा निर्धार नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हळद परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला, वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या हळदीसारख्या नगदी पिकाच्या लागवडीपासून तर मार्केटिंग पर्यंतच्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आहे मॅक्स किसानचे संपादक विजय गायकवाड यांनी...
देशात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हळद परिषदेचे आयोजन एनसीडीईएक्स (NCDEX) ने केले होते. या परिषदेला देशभरातून हळदीच्या मूल्य साखळीतील धोरणकर्ते, एफपीओ (FPOs), व्यापारी, कॉर्पोरेट्स, प्रक्रियादार आणि निर्यातदार उपस्थित होते.
आगामी काळातील हळदीचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी एनसीडीईएक्स (NCDEX) आणि हळद संशोधन केंद्र हरिद्रा (Haridra) यांच्यात गुणवत्ता, ग्रेड, लागवडीच्या पद्धती, किंमत जोखीम व्यवस्थापन, वित्त इत्यादींबाबत जागरूकता करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी सामंजस्य करारावर देखील स्वाक्षरी करण्यात आली.
एकदिवसीय ग्लोबल हळद कॉन्फरन्सचा समारोप हळदीच्या उद्योग वाढीचा आणि विकासाचा मार्ग मोकळा करणार्या आव्हाने आणि संधींवर चर्चा करून संपन्न झाला.
हळदीला 'गोल्डन कमोडिटी' म्हणून संबोधले जाते. एनआयसीआर (NICR) (एनसीडीईएक्स (NCDEX) इन्स्टिट्यूट ऑफ कमोडिटी रिसर्च) आणि टेफला यांनी आयोजित केलेल्या परिषदेत हळदीच्या परिसंस्थेच्या भागधारकांचा मोठा सहभाग दिसून आला.
संपूर्ण हळद मूल्य शृंखला विकसित करण्यासाठी गुणवत्ता, दर्जा, लागवड पद्धती, किंमत जोखीम व्यवस्थापन, वित्त इ. बद्दल जागरूकता उपक्रमांमध्ये सहकार्य करण्यासाठी एनसीडीईएक्स (NCDEX) आणि हरिद्रा (Haridra) यांच्यात सामंजस्य करार देखील करण्यात आला.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख आहेत,ते म्हणाले, “हळद आता महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी आश्चर्यकारक रित्या फायदेशीर ठरत आहे. राज्यातील 7-8 जिल्ह्यांमध्ये सुमारे 25 लाख टन हळदीचे उत्पादन केले जाते जे आपल्या देशाच्या एकूण स्थानिक वापराच्या सुमारे 50% आहे.
याव्यतिरिक्त, महाराष्ट्रात काही ठिकाणी 5-6% कर्क्युमिन असलेली हळद पिकविली जात आहे, जी भारतात उत्पादित हळदीच्या सरासरी कर्क्यूमिन सामग्रीपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. हे पीक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रमुख साधन बनले आहे आणि आमचे आगामी संशोधन केंद्र या प्रक्रियेला पुढील स्तरावर नेईल,”
“कमोडिटी उत्पादन चक्राच्या विकासामध्ये असे प्लॅटफॉर्म महत्त्वाची भूमिका बजावतात कारण सर्व मूल्य साखळीतील सहभागींना एकाच ठिकाणी कमोडिटीच्या लागवडीपासून मूल्यवर्धन आणि निर्यातीपर्यंतच्या प्रक्रियेशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर चर्चा करण्याची संधी मिळते. हे उद्योगाच्या एकूण कामकाजात सुसंवाद आणि सुसंगतता आणते. एक्सचेंज सर्व बाजारातील सहभागींसाठी व्यवहाराचे एक समान ठिकाण निर्माण करण्यावर आहे आणि या पहिल्या ग्लोबल हळद कॉन्फरन्सने आपले उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य केले आहे," असे एनसीडीईएक्स (NCDEX) चे एमडी (MD) आणि सीईओ (CEO), अरुण रास्ते म्हणाले.
या कार्यक्रमात हळद क्षेत्रातील विविध घटक, जसे की सर्वोत्तम उत्पादन पद्धती, विपणन, गुणवत्ता, किंमत जोखीम व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यावर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले. नवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया पद्धती आणि इनपुट डेव्हलपमेंट हळद व्यवसायात कशा प्रकारे क्रांती घडवत आहेत यावरही या परिषदेत प्रकाश टाकण्यात आला. पीक लागवडीवर लक्षणीय परिणाम करणाऱ्या हवामान परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आणि हळद लागवडीवर होणार्या परिणामांविषयी माहिती दिली.
हळदीचे भाव ऐतिहासिक वाढले आहेत. शेतीमातेची आणि बाजाराची परिस्थिती पाहता हळदीचा क्विंटल चा भाव 23 हजारापर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. मार्केट नेहमी मागणी आणि पुरवठ्याच्या गणितावर आधारित असते. या परिषदेमध्ये मांडणी करताना श्रीकांत कुवळेकर म्हणाले, " हळद कितीही महाग झाली तरी माणसं हळद वापरायची बंद करत नाहीत किंवा स्वस्त झाली तरी माणूस दोन चमचे अधिक हळद वापरत नाही." एकंदरीतच कोविड नंतर हळदीचे मार्केट बदलले. शेतकऱ्यांसाठी जमोची बाजू म्हणजे हळद मार्केटला चांगले दर मिळेल पर्यंत साठवून ठेवता येणे शक्य आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा आणि उभारणी साठी सरकारकडून मदतही होते.
जगात भारत सर्वात मोठा हळद उत्पादक आणि निर्यातदार आहे भारतामध्ये महाराष्ट्र सगळ्यात मोठा उत्पादक आहे. हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांनी हळदीसाठी मोठा पुढाकार घेतला आहे.याशिवाय, या परिषदेमध्ये हळद क्षेत्रामधल्या नवीन संधींचा शोध घेतला, क्षेत्रातील औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठी कल्पना आणि युक्त्या मांडण्यात आल्या.कधी नव्हे या परिषदेमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) शेतकरी, एक्सचेंज आणि धोरणकर्ते सहभागी झाले होते. अनेक चर्चासत्रांमध्ये शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होता.
हळदीच्या शेतीशी संबंध असूनही वर्षानुवर्षे शेतकऱ्यांपासून दूर असलेले हळद उद्योजकया परिषदेत सहभागी होते. हळद परिषदेचे सादरकर्ते एव्हरेस्ट मसाले (Everest Masale) असून त्याला हरिद्राने (Haridra) पाठबळ दिले होते. सीपीएआय (CPAI), शेअर इंडिया (Share India), ग्लोब (Globe), केडिया ऍडव्हायझरी (Kedia Advisory), कृष्णा कॅनव्हासिंग (Krishna Canvassing), सांगलीचे विवेक शाह, यूके खिमजी अँड कंपनी (UK Khimji & Co.), मनोहर ट्रेडिंग कंपनी (Manohar Trading Co.), सांगलीचे सतीश चौधरी, स्टारअॅग्री (StarAgri), पृथ्वी फिनमार्ट (Prithvi Finmart), स्वानी स्पाइसेस (Swani Spices), फिंडॉक Findoc), आयएसएफइए (ISFEA), पिनॅकल (Pinnacle), एंजल वन (Angle One), जेआर स्पाइसेस (JR Spices), एसएमसी (SMC) आणि नीलकंठ कॉर्पोरेशन (Neelkanth Corporation) असे इतर भागीदार परिषदेमध्ये सामील झाले होते.
धारणपणे महाराष्ट्र हळद उत्पादनामध्ये अग्रेसर असे सांगितले जात आहे . आकडेवारीचा जर आढावा घेतला तर हळद लागवडीत या पूर्वी आंध्र प्रदेशची मक्तेदारी होती. त्यापासून तेलंगणा विभक्त झाल्यानंतर तेलंगणांमध्ये गेल्या वर्षी ५६ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होती. महाराष्ट्रात नोंद घेण्यास सुरुवात झाल्यानंतर २०१९-२०मध्ये हळद लागवड क्षेत्र ५४ हजार ८८५ हेक्टरवर पोहोचले आता थेट ८४ हजार हेक्टर क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र देशात हळद लागवडीत अव्वल ठरला आहे. - उत्पादकतेत दुसऱ्या स्थानी लागवड क्षेत्रात महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र २६.१ टन प्रति हेक्टर उत्पादकतेच्या माध्यमातून बिहार पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राची उत्पादकता २०.३ टन प्रति हेक्टर असून, उत्पादकतेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.
हळद भारतात कुठे?
भारत हा जगातील सर्वांत मोठा हळद लागवड करणारा, हळद उत्पादन करणारा आणि निर्यातदार देश आहे. चीन, म्यानमार, नायजेरिया आणि बांगलादेशामध्येही हळदीची लागवड केली जाते. जगातील हळदीखालील क्षेत्राचा विचार केल्यास मुख्य क्षेत्र भारत असून, जगातील एकूण लागवडीपैकी ८२ टक्के लागवड एकट्या भारतात होते. त्याखालोखाल चीनमध्ये आठ टक्के, म्यानमारमध्ये चार टक्के, नायजेरियात तीन टक्के आणि बांगलादेशात तीन टक्के इतके हळदीचे क्षेत्र आहे. आयुर्वेदात हळदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन चिकित्सा पद्धतीत हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. पारंपरिक उपचार पद्धतीसह करोना साथीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आयुर्वेदिक औषध म्हणून हळदीचा वापर जगभरात वाढला होता. आरोग्यासह हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. हळद भारतीयांच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा घटक आहे.
हळदीच्या उत्पादन खर्चाचे गणित
साधारणपणे एका एकरात हळद उत्पादन घेण्यासाठी एक लाख २० हजार ते एक लाख ४० हजारांपर्यंत खर्च येतो. एक एकरात सुमारे ३५ क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन निघते. या हळदीला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तरच हळद लागवड करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. मात्र, सध्या मिळणारा दर अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
हळद बियाण्याचे मार्केटही मोठे
सांगलीचा हळद बाजार जसा प्रसिद्ध आहे, तसाच हळद बियाण्यांचा बाजारही प्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकच्या सीमाभागातून शेतकरी बियाणे खरेदीसाठी सांगलीत येतात. त्यामुळे बाजार समितीत दर वर्षी सुमारे ७०० (एका गाडीत १६ टन बियाणे) गाड्या हळद बियाण्यांची उलाढाल होते. प्रत्येक हंगामात किमान ४०० ते ५०० गाड्या हळद बियाणे विक्री होते. गेल्या वर्षी हळदीच्या बियाण्यांचा दर प्रतिक्विंटल ४००० ते ४२०० रुपये होता. हंगामात ४०० ते ५०० गाड्या म्हणजे ६४०० ते ८००० टन बियाण्यांची विक्री झाली होती. यंदा मात्र, हळदी बियाण्यांची विक्री अत्यंत संथ गतीने होत आहे. सध्या हळद बियाण्यांचा दर २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.
साधारणपणे एका एकरात हळद उत्पादन घेण्यासाठी एक लाख २० हजार ते एक लाख ४० हजारांपर्यंत खर्च येतो. एक एकरात सुमारे ३५ क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन निघते. या हळदीला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तरच हळद लागवड करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते.
हळद प्रक्रिया उद्योग व त्यामधील व्यावसायिक संधी
भारत हळद पिकवणारा एक प्रमुख देश आहे. हळद एक मसाल्याच्या पिकातील प्रमुख नगदी पीक म्हणून प्रचलित आहे. प्रति वर्षी 25 लाख प्रती टन मसाले पिकाचे उत्पादन होते. भारतातील अनेक राज्यांत प्रमाणेच महाराष्ट्रातही मसाले वर्गीय पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी 76 टक्के हळद उत्पादन भारतात होते. महाराष्ट्रात हळद प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर या जिल्ह्यात होते.
हळद प्रक्रिया कला होते :( शिजवणे )
अ )पारंपारिक पद्धत
पारंपारिक पद्धती मध्ये गूळ तयार करण्याच्या उथळ कढई चा वापर करतात. कढईत कंद भरल्यानंतर पाला, माती, गोणपाट, शेणाचा थर टाकून वरचे तोंड बंद करावे लागते. कढईत मध्यभागी हळदीच्या कंदाची उंच रास करतात. तसेच कढईच्या घाटाखाली चार ते पाच सेंटीमीटर पाणी भरतात. पहिल्या अंधना स अडीच तास लागतात. हळद शिजवत असताना त्यामधून पांढऱ्या रंगाच्या वाफ पडून विशिष्ट वास आल्यावर एखादी टोकदार काडी हळदकुंडात आरपार जात असेल तर हळद शिजली असे समजावे. हळद चांगली शिजली असताना हळकुंडाचा कडकपणा व उग्र वास कमी होतो. हळकुंडाला एकसारखा रंग येतो. तसेच वाळवणी ला वेळ कमी लागतो.
पारंपरिक पद्धतीचे तोटे
इंधन व वेळ जास्त लागतो. तळातील हळद जास्त शिजते, मधली हळद छान शिजते व शेंड्यावर हळद कमी शिजते. शेणा माती चा वापर केल्याने हळदीचा अन्नामध्ये वापर करण्यास मर्यादा येऊ शकते. लाकडाच्या दाताळ यांनी हळद कढईतून काढल्यामुळे खरचटले जाते व वाढविताना हळदीचा पिवळेपणा कमी होतो.
ब) सुधारित पद्धत( केंद्रीय अन्नतंत्रज्ञान संशोधन संस्था विकसित ) या पद्धतीमध्ये हळद कंद स्वच्छ धुऊन, मुळ्या कापून घेतात. गड्डे काढल्यापासून दोन-तीन दिवसांत प्रक्रिया करावी. डिझेलच्या टाक्यापासून दीड फूट उंची व दोन फूट व्यासाचे सच्छिद्र ड्रम बनवून घ्यावेत. एका ड्रममध्ये 45 ते 50 किलो कच्ची हळद भरावी व कढईला झाकण लावावे. हळद शिजविताना त्यामध्ये 0.05 ते 0.1 टक्के सोडियम कार्बोनेट व 60 किलो ओल्या हळदीसाठी 20 ग्रॅम सोडियम बायसल्फईट व 20 ग्रॅम हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकावे. वीस ते पंचवीस मिनिटे शिजवल्यानंतर एखादा तुकडा हाताने काढून हाताच्या अंगठा ने वरची साल काढून पाहतात. साल जर सहज निघाली तर हळद शिजली असे समजावे. काहीजण एखादी गवताची काडी शिजणाऱ्या हळदीच्या तुकड्यांमध्ये टोचून आरपार गेले तर हळद शिजली असे समजतात. हळद शिजलेली असते त्यावेळेस पाण्याचे तापमान 98 ते 100 अंश डिग्री सेल्सिअस असते. हळद शिजल्यानंतर बांबू ड्रमच्या आकड्यांमध्ये अडकवून ड्रम दोन व्यक्तींकडून कमी कष्टात उचलून बाजूला करता येतात. कढईची बुडाची बाजू सोडून इतर बाजूवर तापमान रोधक आच्छादन केल्यास व सच्छिद्र ड्रम ठेवल्यानंतर कढई चे तोंड पुन्हा कच्ची हळद भरून बंद करावे. म्हणजे इंधनाचा योग्य वापर होऊन हळद शिजवण्याचा वेळ कमी होऊ शकतो.
सुधारित पद्धतीचे फायदे:
हळद एक सारखी शिजते. पॉलिश केल्यावर हळदीला आकर्षक पिवळा रंग येतो. गरम पाणी पुन्हा वापरले आणि इंधनाची व वेळेची बचत होते. शिजवताना पाण्यातील माती हळकुंडावर जमा होत नाही. शिजवायला ठेवणे व बाहेर काढणे सोपे जाते.
हळद वाळविणे
उच्च प्रतीची व टिकाव पणा साठी शिजवलेली हळद एकसारखी वाळविणे. वाळविण्याची क्रिया फरशीवर किंवा सिमेंट कॉंक्रिट वर करावे. साधारण पाच ते सहा सेंटीमीटर जाडीचा थर पसरून ठेवावा. यापेक्षा कमी जाडीचा थर असल्यास कुरकुमीन चे प्रमाण कमी होते. तसेच हळकुंडाचे काम करून वाळविण्यासही उष्णतेमुळे कुरकुमीन हे रंगद्रव्य वरून जाते व हळदीचा फिक्कट रंग येतो. हळद एकसारखी वाळवावी म्हणून मधून मधून गड्ड्याची उलथापालथ करावी. उन्हात हळद वाळविल्यास सुमारे 10 ते 15 दिवस लागतात. ताज्या गड्ड्याच्या वजनाच्या सुमारे 20 टक्के वाळलेली हळकुंडे मिळतात.
हळद वाळविण्याची विद्युत पद्धत:
विद्युत वाळवणी यंत्रात हळद वाळविण्यास पाच ते सहा दिवस लागतात. टनेल ड्रायर मध्ये वाळविण्यास पाच ते सात दिवस लागतील. हळद शेडनेट मध्ये वाढविणे जेणेकरून हळदीतील कुरकुमीन हे रंगद्रव्य प्रमाण टिकून राहत.
हळद पॉलिश करणे
हळद वाळून चांगली टणक झाल्यानंतर पॉलिस करावी. पॉलिश केल्यामुळे कठीण काळपट पणा निघून जातात व हळद स्वच्छ होऊन पिवळी, चमकदार व गुळगुळीत बनते. पॉलिश केल्यावर चांगला बाजारभाव मिळतो.
पॉलिश करण्याच्या विविध पद्धती:
हाताने चालविण्याचे यंत्र: लाकडी ड्रम
स्वयंचलित यंत्र: दोन माणसे दोन तासात 50 ते 60 किलो हळद पॉलिश करतात. यासाठी दोन अश्वशक्तीची सिंगल फेज मोटार लागते.
हळदी ला रंग देणे / पावडर कोटिंग करणे
हळकुंडाचा रंग एकजीव एकसारख्या प्रमाणात पिवळी दिसण्यासाठी पॉलिशिंग करताना हळदीचे मिश्रण लावावे. एक क्विंटल हळदीच्या
पोलिशिंग साठी खालील द्रावणाची शिफारस केली आहे.
तुरटी – 40 ग्रॅम
हळद पावडर – दोन किलो
एरंडीचे तेल- 140 गेम
खाण्याचा सोडा- तीस ग्राम
पॉलिशिंग मुळे हळकुंडाला चकाकी व उजळ धमक डोळा रंग येतो. पॉलिश केल्यावर 15 ते 25 टक्के हळकुंडे मिळतात. पॉलिश केलेली हळकुंडे दुहेरी पोत्यात भरून गोदामात साठवितात. हळकुंडे ज्यूटची पोती, लाकडी पेट्या किंवा जाळीदार कार्डबोर्डच्या पेट्यात साठवतात. पॉलिश न केलेली खडबडीत हळकुंडे दोन ते तीन पेवात साठविता येते.
हळकुंडाची गुणवत्ता मानके:
हळकुंडाची प्रत ही रंग, आकर्षकपणा व आकार यावर ठरते. हळकुंडाचा रंग गर्द पिवळा असावा व कडूपणा कमी असावा. हळकुंड दोन ते आठ सेंटिमीटर लांब व एक ते दोन सेंटिमीटर जाड हे गुणधर्म महत्त्वाचे असतात. हळकुंडाला मध्यभागी तोडले असतात तुटलेला भाग सपाट, नारंगी लाल असावा. हळकुंडाचा पृष्ठभाग मेणचट व शिंगा सारखा दिसावा. हळकुंडाचा वास कस्तुरी व काळी मिरी सारखा व स्वाद किंचित कडू असावा. ओलिओरेसिन / भुकटीसाठी हळकुंडाचे लहान तुकडे चालतात.
ऍगमार्क मानके: आद्रता नऊ टक्के, तुकडे दोन टक्के, टाकाऊ पदार्थ एक टक्के, गोल्ड गाडे 2%, इतर कचरा एक टक्का, बुरशी दोन टक्का
हळद प्रक्रिया पूर्वी लक्षात ठेवायचे मुद्दे
जेठे गड्डे व अंगठे गड्डे शिजवू नये. हळद काढणीनंतर जास्तीत जास्त दोन दिवसांत शिजवून घ्यावी. रोगट हळद प्रक्रियेसाठी घेऊ नये. शेणाने सारवलेल्या पृष्ठभागावर हळद वाळत घालू नये. हळदीच्या चांगल्या रंगासाठी हळदीच्या पावडरी शिवाय कोणतेही रसायन वापरू नये. अर्धी ओली आणि वाळलेली हळकुंडे एकत्र मिसळू नयेत. खराब पोत्यांमध्ये किंवा जागेवर हळद साठवून ठेवू नये. कुरकुमीनचे जास्त प्रमाण असलेल्या जातीची निवड करावी. पीक पक्व होण्यापूर्वी काढणी करू नये. काढणी करताना गड्ड्यांना इजा होऊ देऊ नये. शिजविण्यासाठी समप्रमाणात उष्णता द्यावी.
एकंदरीतच ज्या पद्धतीने हळदीचा उत्पादन ते मार्केटिंग असा प्रचार प्रसार महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि साठवून ठेवण्याचे हक्काचे नगदी पीक ठरल्याने आगामी काळात हळदीचा बोलबला असेल. हळदीच्या या सोनेरी क्रांतीसाठी सगळे मिळून सज्ज राह