राज्यातील १३०० शाळा बंद करण्यात आल्यानंतर छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे रवी गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर फेसबुकवर पोस्ट टाकत अभाविपची या संदर्भात काय भूमिका आहे, अशी विचारणा केली होती. त्यावरुन दत्ता डगे यांना अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून फोनवरुन आता आमचे तोॆड बंद होईल, हात चालू होतील अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप छात्रभारतीने केला आहे.
यासंदर्भात छात्रभारतीचे उपाध्यक्ष सागर भालेराव आणि मुंबई छात्रभारतीचे अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना आपली बाजू मांडली.