मुंबई विद्यापीठच्या निकालाचा अभूतपूर्व गोंधळ काही दिवसांपासून सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत विद्यापीठाचा गलथान कारभाराचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय... यासंदर्भात छात्रभारती संघटनेने अनेक आंदोलनं केली असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करून लवकरात लवकर त्यावर तोडगा काढवा अशी मागणी केली आहे. तसेच संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना मुंबई विद्यापीठ आणि सरकारचा जाहीर निषेध केला आहे. वारंवार दिली जाणारी डेडलाईन तसेच राखीव ठेवलेल्या निकालांमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेलं आहे त्यांना ज्या ठिकाणी प्रवेश घ्यावयाचा होता तो देखील यामुळे घेता आला नाही.
https://youtu.be/J-H6_wMcWZY