UPSC result: यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, शुभम कुमार अव्वल

UPSC result Union Public Service Commission Civil Services Exam यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, शुभम कुमार अव्वल;

Update: 2021-09-24 17:32 GMT

यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल आज २४ सप्टेंबर ला घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, अंतिम परीक्षेत एकूण ७६१ उमेदवार पास झाले आहेत. ही परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० ला घेण्यात आली होती.

परीक्षेसाठी १० लाख ४० हजार, ६० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ४ लाख ८२ हजार ७७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दरम्यान, जानेवारी, 2021 मध्ये झालेल्या लेखी (मुख्य) परीक्षेत एकूण 10564 विद्यार्थी पास झाले होते, तर व्यक्तीमत्व विकास चाचणीसाठी (Personality Test) साठी एकूण 2053 विद्यार्थी बोलावण्यात आले होते.

त्यातील एकूण 761 विद्यार्थ्यांना (545 पुरुष आणि 216 महिला) आयोगाने विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आमंत्रित केलं आहे. यामध्ये, शुभम कुमार रोल नंबर 1519294 याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

UPSC result, Shubham Kumar, Civil Services Exam, UPSC topper 

Tags:    

Similar News