महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांसाठी पर्यायी पद्धत बंद करून नवी वर्णनात्मक पद्धत आणली. आयोगाने आणलेली नवी पद्धत २०२५ पासून लागू करावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठींबा दिला आहे. नवा अभ्यासक्रम लगेच लागू केल्यानंतर अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर या निर्णयाचे काय परिणाम होतील याबाबत त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी....