बारावी पेपर फुटी प्रकरणी चार शिक्षकांचे निलंबन...
बारावीच्या परिक्षा सुरु झाल्या आणि पेपर फुटीचे प्रकरण समोर आले. याप्रकरणी चार शिक्षकांना अटक करण्यात आली होती. या चार आरोपी शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश आज शिक्षण संस्था चालकांनी दिले.;
बारावीच्या (12th Exam) गणित पेपर फुटी प्रकरणी पोलिसांसोबत शिक्षण विभाग देखील दोषींवर आपल्या माध्यमातून कारवाई करत आहेत. गणिताचा पेपर फुटी प्रकरणी दाखल गुन्ह्यात साखरखेर्डा पोलीसांच्या ताब्यात असलेले ४ आरोपी शिक्षकांना (Teacher) निलंबित करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने, चारही शिक्षणसंस्था संचालकांना दिले आहे. अशी माहिती बुलढाणा माध्यमिक शिक्षणाधिकारी (Buldhana Secondary Education Officer) प्रकाश मुकुंद यांनी दिली आहे.
बारावीच्या (12th Exam) गणिताच्या पेपरफुट प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती विभागीय मंडळाच्या सचिवांनी या चारही आरोपी शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याने चार आरोपी शिक्षकांवर (Teacher) ही कारवाई करण्यात आली आहे. लोणार येथील झाकिर हुसेन उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अब्दुल अकील, अब्दुल मुनाफ, लोणार येथीलच सेंट्रल पब्लिक स्कुल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक अकुंश पृथ्वीराज चव्हाण, किनगाव जट्टू येथील वसंतराव नाईक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे शिक्षक गजानन शेषराव आडे आणि शेंदुर्जन येथील संस्कार ज्युनिअर कॉलेजचे गोपाल दामोदर शिंगणे या चारही शिक्षकांना निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती बुलढाणा माध्यमिक शिक्षणाधिकारी (Buldhana Secondary Education Officer) प्रकाश मुकुंद यांनी दिली आहे.