'महाज्योती'च्या कार्यालयापुढे विद्यार्थ्यांची तीव्र निदर्शने

Update: 2021-10-22 10:20 GMT

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. एम.फील कऱणाऱ्या विद्यार्थ्यांच्या छात्रवृत्तीच अंतिम यादी प्रकाशित करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले. ओबीसी, एसबीसी या प्रवर्गातील मागास आणि अतिमागास, अति दुर्बल घटकातील संशोधक विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या संशोधनाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा संस्थेचा उद्देश आहे. संचालक मंडळाने मागण्या मान्य कराव्या, विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी, संशोधक विद्यार्थ्यांना त्या धर्तीवर विद्यावेतन देण्यात यावे, विद्यार्थ्यांचा प्रवेश नोंदणी पासून विद्यावेतन देण्यात यावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

Tags:    

Similar News