PHD, CET चे मूल्यांकन होईल, स्थगिती विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी- कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी

Update: 2024-01-15 15:53 GMT

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 11 जानेवारी रोजी पीएचडी फेलोशिप संदर्भा मध्ये घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेच्या निकालावर स्थगिती देण्यात आली होती. मात्र ही स्थगिती विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी असून मूल्यांकन होईल. असे भाष्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी केले आहे. या वेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ.विजय खरे उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून बार्टी सारथी आणि महाज्योती संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या पीएचडी फिलोशीप संदर्भात चाळणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये सुरुवातीला 24 डिसेंबर रोजी विद्यापीठाकडून 2019 ची प्रश्नपत्रिका कॉपी पेस्ट करण्यात आली. यामुळे ही परीक्षा रद्द करत. पुन्हा 10 जानेवारी रोजी पुन्हा घेण्यात आली. मात्र या वेळी पुणे विद्यापीठाने प्रश्नपत्रिका सेट 'सी ' आणि 'डी ' हे बिना सेलचे पाठवल्याने विद्यापीठाने स्वतः घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाले. यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये विद्यापीठ परिसरामध्ये होऊ लागले. यानंतर विद्यापीठाकडून परिपत्रक काढून ही परीक्षा स्थगित करत असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३वा पदवी प्रदान समारंभ १७ जानेवारी रोजी होणार आहे. या संदर्भामध्ये सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वळी पीएचडी फेलोशिप च्या सीईटी परीक्षेच्या निकालावर स्थगिती संदर्भात प्रश्न विचारला असता. स्थगिती ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी देण्यात आली असून मूल्यमापन होणार आहे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी व्यक्त केली.

विद्यापीठानेच घालून दिलेल्या नियमांचे पालन विद्यापीठाने केले नाही. मात्र याचे पालन विद्यार्थांनी केले.यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर घेतला नाही आणि परीक्षा दिली नाही. यामुळे मूल्यमापन कसे करणार असा सवाल कुलगुरूंना विचारला असता त्यांनी या प्रश्नावर उत्तर द्यायचे टाळत विषय बदलला.

Tags:    

Similar News