Max Maharashtra impact: दिव्यांगासाठीच्या शाळा अखेर सुरू

कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या शाळा सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. तर दिव्यांगांच्या शाळा सुरू करण्याबाबत मॅक्स महाराष्ट्रने वारंवार आवाज उठवला होता. त्याला अखेर यश आले असून दिव्यांगांच्या शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Update: 2022-02-28 16:19 GMT

कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर झाला आहे. मात्र सामान्य विद्यार्थ्यांसाठीच्या शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. परंतू दिव्यांगांसाठीच्या शाळा बंदच होत्या. त्याचा मॅक्स महाराष्ट्रने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले आहे. तर शासनाने दिव्यांगांच्या निवासी शाळा सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. त्याचा राज्यातील हजारो दिव्यांगांना मोठा फायदा होणार आहे.

कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेल्या सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र राज्यातील हजारो दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या निवासी शाळा बंद होत्या. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न समोर आला होता. त्या प्रश्नावर मॅक्स महाराष्ट्रने आवाज उठवला होता. तर राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्याबरोबरच अनेक शिक्षकांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या होत्या. तर मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी या संपुर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यावर विविध चर्चासत्रांचे आयोजन केले होते. तर या प्रकरणाचा मंत्रीमंडळाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले. तर अपंग कल्याण आयुक्तांनी दिव्यांगांच्या निवासी शाळा सुरू करण्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

दिव्यांगांच्या शाळा सुरू झाल्याने दिव्यांगांनी मोठ्या प्रमाणावर आनंद साजरा केला. तर आमच्या शाळा बंद असताना आमचं मोठं नुकसान झाले. मात्र आमची मॅक्स महाराष्ट्र वगळता कोणत्याही माध्यमानी दखल घेतली नाही. परंतू मॅक्स महाराष्ट्रने आमची दखल घेऊन पाठपुरावा केला. त्यामुळे आमच्या शाळा सुरू झाल्या. त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्रचे आभार मानतो, अशी प्रतिक्रीया करण पवार याने दिली.

दिव्यांगांचे शिक्षक योगेश चौधरी म्हणाले, "इतर माध्यमांकडून दिव्यांगाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जात नाही. मात्र Max Maharashtra या प्रश्नांकडे विशेष लक्ष देत आहे ही आनंदाची बाब आहे. तर दिव्यांगांच्या शाळा सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्रचे आभार, असे मत व्यक्त केले.

डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती येथील मुख्याध्यापक नवनाथ इंगोले म्हणाले, मॅक्स महाराष्ट्रने दिव्यांगांच्या शाळा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आणि चर्चासत्र आयोजित केले. त्याचाच परीणाम म्हणून दिव्यांगांच्या निवासी शाळा सुरू झाल्या आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे, अशी प्रतिक्रीया इंगोले यांनी दिली.

अखेर दिव्यांगांच्या बंद असलेल्या निवासी शाळा सुरू करण्याबाबत मॅक्स महाराष्ट्रने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. तर याबाबत अपंग कल्याण आयुक्तांनी परिपत्रक जारी करत शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.



Tags:    

Similar News